-
पान का काळे करू – PAAN KAA KAALE KAROO (why blacken the page)
-
दवबिंदुंची निर्मळ भाषा – DAVBINDUNCHEE NIRMALH BHAASHAA (pure language of due drops)
दवबिंदुंची निर्मळ भाषा कुठे कुणाला कळते आता बोलीमधली अस्सल गाथा कुठे कुणाला कळते आता केंद्रच नाही ठाउक ज्याला तोच ठरवितो दिशा अताशा उजवासुद्धा असतो डावा कुठे कुणाला कळते आता अंतरातल्या मायेला जो कपट ठरवितो तो शब्दच्छल कोण काळ अन कोण विधाता कुठे कुणाला कळते आता घाई घाई करून खाई क्षुधा तयाची भडकत जाई कशामुळे ही…
-
साद दे रे – SAD DERE(CALL ME )
कशी काय बोलू मला बोलवेना कसा भार साहू अता साहवेना हृदय वाहते हे तुझ्या आठवांनी मनाला तरीही झुला बांधवेना असे वाटते सर्व सोडून यावे कुठे यायचे पण मनाला कळेना करू काय माझ्या-तुझ्या पाकळ्यांचे किती हार गुंफू गळा घालवेना खुशाली तुझी फक्त सांगेल कोणी जळो तूप सारे दिवा मालवेना सुनेत्रा सुनेत्रा अशी साद दे रे तुझे…