-
वाटण घाटण – VAATAN GHAATAN
वाटण घाटण मजेत करतो पाटा वरवंटा सहज फिरे पाट्यावर सर सर माझा वरवंटा पुरण वाटतो कधी खोबरे कधी कधी चटणी हरेक कामामधे साथ दे आता वरवंटा पुरणयंत्र अन मिक्सर सुद्धा हेच काम करती त्यांच्यासम बघ कुशल कितीहा जाडा वरवंटा नका धुण्याला बडवू मजवर म्हणे तुम्हा पाटा बिजली जेव्हा गायब होते काढा वरवंटा हरेक यंत्रासंगे दोस्ती…
-
अनोळखी – ANOLAKHEE
कुणी तरी का तुला म्हणू मी अनोळखी का तुला म्हणू मी फुलाप्रमाणे हृदय तुझे हे जडी बुटी का तुला म्हणू मी सदैव असशी मनात माझ्या जळीस्थळी का तुला म्हणू मी मधुघट अक्षय मला दिले तू कडू गुटी का तुला म्हणू मी सलील निर्झर प्रपात असुनी दरी गिरी का तुला म्हणू मी नवमत वादी विचार तू…
-
गझल लिहू – GAZAL LIHOO
ज्यात काफियासुद्धा नाही अशी आगळी गझल लिहू भजले नाही ज्यात कुणाला असे वेगळे भजन लिहू नियमावलीही अशीच बनवु अपवादाला नियम लिहू शब्द आणखी अक्षर विरहित टिंबटिंबचे कवन लिहू अंबर आभाळी आकाशी नाव नभाचे गगन लिहू कुंपण घालुन बोरीभवती पाटीवरती सदन लिहू जुळवायाला अचूक मात्रा डोळे झाकुन नयन लिहू अलामतीला ठेवु सलामत वायुऐवजी पवन लिहू धूसर…
-
गझाला – GAZAALAA
झालरीचा घेर असुदे वा चुडी ती चुस्त असुदे ही गझाला दक्ष रमणी प्रीत बोली रम्य असुदे तीन असुदे चार असुदे लक्ष अथवा अब्ज असुदे नेत्र उघडुन पाहणारे लक्ष्यभेदी भक्त असुदे मौन असुदे वा पुकारा ध्यास जीवा रंगण्याचा मुग्ध हृदयी फूल जपण्या प्रेम सच्चे फक्त असुदे मज नको फुकटात काही बंगला गाडी मळा रे सर्व मी…
-
भागिदारी – BHAAGIDAAREE
खूप म्हणजे खूप रुचली स्वाभिमानी भागिदारी विकृतीला तुडविणारी भावनांची भागिदारी पेरुनी मातीत मोती पीक येते सप्तरंगी फाल्गुनाला आज कळते श्रावणाची भागिदारी चारुशीला रामपत्नी कमलनयना जनककन्या मैथिलीला पुरुन उरली रावणाची भागिदारी उंबरा नाकारतो हे मैत्र वृंदा रुक्मिणीचे का बरे त्याला पटेना अंगणाची भागिदारी शारदेच्या चांदण्यांसम फुलुन येता रातराणी तरुतळी स्वप्नात रमते मोगर्याची भागिदारी वृत्त – गा…
-
पान का काळे करू – PAAN KAA KAALE KAROO
सांग मी मम पुस्तकाचे पान का काळे करू काजळीने लोचनातिल भाव का काळे करू शान माझ्या चेहऱ्याची रुंद मोठे उंच जे फक्त मजला शोभते ते नाक का काळे करू धन्य झाले तृप्त झाले संत वचने ऐकुनी झळकती ऐन्यापरी ते कान का काळे करू मी न कुठले कार्य करते मी स्वतःला तोलते तोलताना बोलताना ओठ का…
-
दवबिंदुंची निर्मळ भाषा – DAVBINDUNCHEE NIRMALH BHAASHAA
दवबिंदुंची निर्मळ भाषा कुठे कुणाला कळते आता बोलीमधली अस्सल गाथा कुठे कुणाला कळते आता केंद्रच नाही ठाउक ज्याला तोच ठरवितो दिशा अताशा उजवासुद्धा असतो डावा कुठे कुणाला कळते आता अंतरातल्या मायेला जो कपट ठरवितो तो शब्दच्छल कोण काळ अन कोण विधाता कुठे कुणाला कळते आता घाई घाई करून खाई क्षुधा तयाची भडकत जाई कशामुळे ही…