-
ईद – EID (fetival of muslim community)
चंद्र पाहिला अंबरात अन हृदयात उमटली ईद निळ्या समुद्री उधाणले जल हृदयात उमटली ईद गुलाब काही मनातले मी वहीत ठेवून जपले वही उघडता आज अचानक हृदयात उमटली ईद जुनी डायरी त्यातिल नावे कुठे हरवली आहेत पुस्तकात ती बसता शोधत हृदयात उमटली ईद चंद्रकोर नाजुक झुलणारी नाविक मी जणु नावेत भवती मासे फिरता सळसळ हृदयात उमटली…
-
गोम्मट हाऊस – GOMMAT HOUSE
गोम्मट व्हिल्यावर घन झुकला पाण्याने भरल्यावर झुकला रंग पारवा निळसर ज्याचा असा जिना वळणावर झुकला वेल कळ्यांनी लदबदली अन शुभ्र फुलांचा मांडव झुकला भित्तीचित्रे कलापूर्ण ही पहा त्यातला मानव झुकला जलाशयावर बरसायाला रंग भरूनी श्रावण झुकला गोम्मट हाऊस मधुन कटता व्यंतर कपटी ! नागर झुकला गोम्मट हाऊस मधले प्रेम पाहुन ओला मोसम झुकला जेते इथले…
-
जुनेरे – JUNERE (ragged attire)
फुले धरेवर जशी सांडती तश्या भावना सांडू आपण काव्य रचूनी ताजे ताजे विचार सुंदर धाडू आपण कर्म जरी प्राचीन जुनेरे स्वच्छ धुवोनी नेसू आपण तेच सोवळे आहे मानून स्तुती जिनांची गाऊ आपण जसा आपुला विचार उमटे तशी भावना उमलुन यावी शब्दांमध्ये गुंफुन तिजला बुद्धीपूर्वक मांडू आपण सरळ अर्थ काव्यातून दिसण्या सरळ सरळ अन सरळ बघूया…
-
तुझ्याआधी – TUZYAA AADHEE
तुझ्याआधी घरी माझ्या पाऊस आला कुणासाठी घरी माझ्या पाऊस आला चिंब काया मोहराया रिंगण धराया चंद्रमौळी घरी माझ्या पाऊस आला अंतरीचे बोल बोली ऐकून टिपण्या देत हाळी घरी माझ्या पाऊस आला झरे ओढे वाहताती संगीत देण्या भरत पाणी घरी माझ्या पाऊस आला तावदाने वाजवूनी डोकावत हळू म्हणत गाणी घरी माझ्या पाऊस आला सुनेत्राला भेटावया इथे…
-
मुक्त हस्त चित्र – MUKT HAST CHITR
मुक्त हस्त चित्र काढ ओतण्यास त्यात जीव रंगसंगतीस जाण ओतण्यास त्यात जीव वाचणे पुरे अता दिसावयास स्वप्नचित्र गोष्ट तूच ऐक सांग ओतण्यास त्यात जीव गोठ ताप जा ढगात वर्षण्यास शुद्ध नीर बरस चिंब भिजवण्यास ओतण्यास त्यात जीव ये इथे रहावयास आसमंत रम्य क्षम्य बोलुयात खास बात ओतण्यास त्यात जीव प्रेम प्रीत इश्क बिश्क जा बुडून…
-
हंगामा – HANGAAMAA
-
कवित्त्व – KAVITTV
लिहित रहा तू स्वतःस कळण्या हवे स्वतःला काय दुखविलेस का व्यर्थ स्वतःला कारण शोधुन काढ संदेहाच्या हिंदोळ्यावर झोके घेत अनेक विचार घुसळुन सापडेल तुज काव्याची लय छान भुकेल्यास दे घास स्वतःतिल प्रेम मुक्या जीवास प्रायश्चित्तासाठी आता कशास व्रत उपवास भेटीसाठी जो जो आतुर फक्त तयांना गाठ गाठीभेटी घडण्यासाठी प्रयत्न कर तू खास गुरू स्वतःचा स्वतःच…