-
सवारी – SAVARI
तरही गझल … सवारी गझलेची पहिली ओळ कवी धनदत्त बोरगावे मिरज यांची माझी टमटम चालली गावाला वेगात सहा आसनी गावाला टांगे बग्ग्या सायकल रिक्षांचा काळ पुराणा जोजवी गावाला मस्त सवारी सारवट गाड्यांची कुडची मोरब चिंचली गावाला गागागागा गालगा गागागा लगक्रम मात्रा मोजणी गावाला शेवंतीचे ताटवे फुलवाया जलदांची जल वाटणी गावाला अर्थ सुगंधी अक्षरी दरवळतो गझलांजन…
-
जिवंत वेडा – JIVANT VEDAA
तरही गझल गझलेची पहिली ओळ, कवी गंगाधर मुटे यांच्या “स्वदेशीचे ढोंगधतुरे” या कवितेची…. एक आणखी झाडावरती लटकून मेला काल दुसरा कोणी रेलखाली तडफडून मेला काल जिवंत वेडा सुंदर जगला मस्तीत नाचत गात नातीगोती माया प्रीती झटकून मेला काल सदासर्वदा सिग्नल तोडे बाईकवरचा स्वार पुलाखालच्या हातगाडीस धडकून मेला काल पाऊस असा धो धो पडला रस्त्यावरती खड्डे…