गझल … सवारी
मूर्ती गोम्मट चालली गावाला
वेगात सहा आसनी गावाला
टांगे बग्ग्या सायकल रिक्षांचा
काळ पुराणा जोजवी गावाला
मस्त सवारी सारवट गाड्यांची
कुडची मोरब चिंचली गावाला
गागागागा गालगा गागागा
लगक्रम मात्रा मोजणी गावाला
शेवंतीचे ताटवे फुलवाया
जलदांची जल वाटणी गावाला
अर्थ सुगंधी अक्षरी दरवळतो
गझलांजन घन चर्चुनी गावाला
गझल “सुनेत्रा” धावते ऐंशीने
परमानट्टी शिरगुरी गावाला