In this Marathi poem the poetess asks us all to overcome superstitions and blind beliefs.
एक दोन तीन चार
बुवाबाजी हद्दपार
पाच सहा सात आठ
श्रद्धा म्हणजे नाही गाठ
नऊ दहा अकरा बारा
उघडा खिडक्या येण्या वारा
तेरा चौदा पंधरा सोळा
अहंपणाला शिकवा शाळा
सतरा अठरा एकोणीस वीस
भयगंडाचा पाडा कीस
एकवीस बावीस तेवीस चोवीस
चिंता सोडा ती तर खवीस
पंचवीस सव्वीस सत्तावीस
संपवून टाका विकृतीस
अठ्ठावीस एकोणतीस
करू नका घासाघीस
तीस एकतीस बत्तीस
सलाम स्त्रीच्या शक्तीस
तेहतीस चौतीस पस्तीस
चला जाऊ बस्तीस
तीनापुढे सहा छत्तीस
शंभर टक्के गुण विशुद्ध मतीस…