This poem describes how birds celebrate Diwali festival.
आली दिव्यांची दिवाळी
चिमणी उठली सकाळी
उरकून बाळांच्या अंघोळी
देऊन मैनेला हाळी
दोघी गेल्या देऊळी
पोपट तेथे पंडित मामा
चिमणा होता पुजारी बाबा
पूजा केली जोडीने
घरी आल्या गोडीने
पाहुणा आला कावळे भाऊ
त्याने आणला गोड गोड खाऊ
औक्षण केले चिमणीने
फराळ वाढला मैनेने
गोष्टी करायला कोकिळा राणी
गप्पा-टप्पा धमाल गाणी