Kasa dharu bhopala(कसा धरू भोपळा) is a parody poem or vidamban kavya based on original filmsong, kashi karu swagataa(कशी करू स्वागता-मुंबईचा जावई).
This song is written by G.D. madgulkar and music is given by Sudhir fadake. Singer is Suman kalyanpur.
कसा धरू भोपळा
हातामध्ये पकडुन धुवुकी?
नळाखाली आडवा…
वजन कसे मी त्याचे तोलू?
हळूहळू की भरभर सोलू?
घाव सुरीचा घालू का मी
होइल तो मोकळा…
चाकूने की चिरू विळीने?
किसेन अथवा मी किसणीने
घाऱ्या करण्या गूळ घालुनी
गोल मळू ठोकळा…
कुणी न बघते, कौतुक करते
मीच एकली घरी लाटते
तेल तापल्यावरती कोणी
राहिल का सोवळा…