काया अनमोल – KAAYAA ANAMOL


प्राजक्ताचे देठ जणु, ओठ तुझे जर्द बाई, ओठ तुझे जर्द
गुलाबाच्या फुलापरी, गाल तुझे लाल बाई,  गाल तुझे लाल
बागेतल्या भृन्गासम, कृष्ण तुझे नेत्र बाई, कृष्ण तुझे नेत्र

सावळ्या या मुखावरी, चाफेकळी नाक बाई, चाफेकळी नाक
कुंडलात शोभणारे, कान तुझे छान बाई, कान तुझे छान
श्यामरंगी घनापरी, केस तुझे दाट बाई, केस तुझे दाट

पौर्णिमेच्या चंद्रासम, उजळ तुझे भाल बाई, उजळ तुझे भाल
शंखासम गळ्यावरी, फेस तुझा गोल बाई, फेस तुझा गोल
घाटदार पायांवरी, काया अनमोल बाई, काया अनमोल

मात्रावृत्त (१३+१३+९=३५ मात्रा)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.