कुजबुज – KUJ BUJ


गडगड गडगड मेघ गर्जती
झुळझुळ झुळझुळ लहरी फिरती
कडकड कडकड विजा तडकती
झरझर झरझर धारा झरती
सळसळ सळसळ पाने डुलती
टपटप टपटप थेंब सांडती
घरघर घरघर वारे दळती
सरसर सरसर जलकण पडती
खळखळ खळखळ झरे वाहती
किलबिल किलबिल खग किलबिलती
कुजबुज कुजबुज कलिका करती
लदबद लदबद फळे लगडती
चटचट चटचट मुले प्रकटती
पटपट पटपट खात नाचती

मात्रावृत्त (मात्रा १६)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.