कोण पऱ्यांना – KON PARYAANNAA


कोण पऱ्यांना अमुच्या सुंदर आवडती सुकुमार…
शोधुन काढू पिंजुन विश्वा शूर असे सरदार…

मधुबालेसम नाजुक कन्या
कुणी न स्पर्धक त्यांच्या पुण्या
गुढी उभारुन त्या सत्याची उलथतील सरकार…

ऐनकातुनी रोखुन बघती
कपट जाळती मधुर हासती
शोभुन दिसती तळपुन उठती जणू करी तलवार…

अहंपणाचा अर्थ न ‘मी’ पण
तू तू तू तू नसते शिकवण
उपजत प्रीती तिरकस मैत्री सांभाळे अलवार…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.