घरात मी – GHARAAT MEE


The poem ‘Gharaat mee’ is based on the poem ‘Havaas too(हवास तू गीत-जगदीश खेबुडकर संगीत-सुधीर फडके स्वर-आशा भोसले चित्रपट-आम्ही जातो आमुच्या गावा).
This poem is a parody poem or Vidamban kaavya(विडंबन काव्य)

घरात मी, भरात तू, करात मज तू, हवास तू
विमानातुनी, मम काव्याची, काढशील का, वरात तू

फुलांपरी मम, कोमल गझला, वामा विमला, श्यामा अचला
क्षितिजावरच्या, नावेमधुनी, सोड तयांना, जलात तू

वृक्ष वल्लरी, सतेज सुंदर, तडागात बघ, झुकते अंबर
किलबिल करिती, इथे पाखरे, फुलात मी अन, फळात तू

मावळते अन, पुन्हा उगवते, चंद्र-चांदणे, मना खुलविते
सावलीत मी, आम्रतरूच्या, सांज केशरी, उन्हात तू


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.