In this poem the poetess describes happy atmosphere of marriage ceremony.
विहीणबाई व्याहीबुवा घाई करा घाई
लेक माझा राजबिंडा हवी सूनबाई
भरजरी शालू आणि डाग सोनियाचे
गळ्यामध्ये घालायाला सर मोतियांचे
लेक माझी करवली शुभ्रगुणी जाई
नातसून बघायला माय आतूरली
भेटीगाठी होता होता मने सुखावली
कौतुकाची उधळण हसे ठायी ठायी
शाही मंडपात जोडी शोभणार अशी
गुंजणार सनईचे सूर बावनकशी
स्वागताला सासऱ्याची सज्ज आंबेराई