पुन्हा नव्याने सुरू करूया चळवळ जैनत्वाची
शुद्ध जाहल्या जलात उठुदे सळसळ जैनत्वाची
विशाल व्यापक जाणिव जागृत धर्मामध्ये असण्या
नको नाटकी अता वहाया भळभळ जैनत्वाची
बौद्धत्वाचा हिंदुत्वाचा ब्राम्हण्याचा हेका
सैल करावा सुखद वाहण्या झुळझुळ जैनत्वाची
शीख पारशी मुस्लिम ख्रिस्ती अपुले बांधव हे
त्यांच्यासंगे निर्झर व्हावी खळखळ जैनत्वाची
क्षात्रतेज अन छात्र गुरूंचा मस्त मराठी बाणा
तीर अक्षरी सोडून साधू चळवळ जैनत्वाची