बाया बापे बनुन टकाटक आले लावण करावयाला
चिखलामधली रोपे उचलत पावसात तनु भिजावयाला
इरली डोईवरती त्यांच्या रंगबिरंगी किलतानाची
कधी न वाटे भीति तयांना अस्मानीच्या सुलतानाची
शेतामध्ये उभ्या आडव्या करून ओळी अंतर राखत
धारांमध्ये न्हात कुणबिणी गाती गाणी रोपे लावत
हरेक तरुला वाढायाला जागा मिळुदे डुलावयाला
प्रकाश पाणी यांच्यासंगे वारा मिळुदे डुलावयाला
वेगे वेगे उंचच जावे मृदुल कोवळे तरुवर भूवर
मुले मुली मग येतिल नाचत पहावयाला साळी सुंदर
गीत (मात्रा ३२)