This song is known as Lok-geet(folk-song) in Maraathee language. This song is a parody poem based on the original song Naach ga Ghumaa(नाच गं घुमा).
बोल गं ठमा!
कशी मी बोलू?
रागावते, ओरडते
आवशी माझी!
कशी मी बोलू!
रावा की राघू तो,
पोपट शुक-शुक का करतो?
किल्ली दे त्या हळूहळू,
रडेल मग तो बुळूबुळू!
मिठू मिठू तू म्हणता गं,
पान खाऊनी हसता गं,
बघेल तो तुज ऐन्यात!
बसविल तुजला मेण्यात!
हास गं ठमा!
कशी मी हसू!
अता तरी हास खरी!
देईल तुजला पंख परी
उड गं ठमा!
कशी मी उडू!
हास गं ठमा!
कशी मी हसू!
बोल गं ठमा!
कशी मी बोलू!