भारत अमुचा देश! प्रिय आमुचा देश!! – PRIY AMUCHA DESH!!


India is our country. This poem is a patriotic poem. Though there variety in languages, costumes we love our country. Unity in variety is our power.

विविध प्रांत अन विविध बोली,
रंग, रूप जरी वेश;
भारत अमुचा देश! प्रिय आमुचा देश!!

गोड गोजिऱ्या मुली आमुच्या,
शिकत राहतिल कला नी विद्या,
तृण-बाळांना सुद्धा जपतिल,
आयुष्याची स्वत: रेखतिल;
तळहातावर रेष!
भारत अमुचा देश! प्रिय आमुचा देश!!

मुले येथली खंबिर जरी हो,
मृदू मनाची जणू फुले हो,
मात-पित्यांचा करती आदर,
कवेत घेती धरणी अंबर;
निसर्ग त्यांचा वेश!
भारत अमुचा देश! प्रिय आमुचा देश!!

सातपुडा सह्याद्री हिमालय,
भारत भूचे जणु देवालय,
झेलम गंगा कृष्णा तापी,
नीर-क्षीर मधुर पाजून देती;
प्रेमाचा संदेश!
भारत अमुचा देश! प्रिय आमुचा देश!!

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.