In this poem the poetess says, Flower of my heart has bloomed and its fragrance
is spreading everywhere.
माझ्या मनात चाफा, उधळे खरा सुवास
धावे सुसाट वारा, वाहे निळ्या नभात
गाण्यास साथ देण्या वाद्ये कशास आता
हातांसवे सुखाने, मी ओढणार भाता
छेडून तार हृदयी, गातो मजेत वात
चंडोल कोकिळेला, घालेल साद आता
पाण्यातल्या खगांचा, रंगेल राध आता
नाचे खळाळ ओढा पुन्हा नव्या भरात
ही डोलतात झाडे, फांद्याच हात सुंदर
स्वर चिंब चिंब भिजती, रंगात सात सुंदर
आंब्यास मंजिरीचा येतो सुवास खास