In this poem the poetess says, we are sculptures of new age. We can creat heaven on the Earth.
शिल्पकार, आम्ही नव्या युगाचे, लेणी नवी घडवू!
मनामनातून चैतन्याची प्रभात आम्ही फुलवू!
विज्ञानाची कास धरोनी
अंतरीचा आवाज स्मरोनी
सम्यकश्रद्धा हृदयी जपुनी लक्ष दीप लावू,
भारतभूची आम्ही लेकरे
मराठमोळी फूलपाखरे
मनी मातीचा गंध स्मरोनी, गगन भरारी घेऊ!
संगणकाशी मैत्री आमुची
परि गुलामी नकोच त्यांची
बुद्धीसंगे मनास फुलवून, तेज नवे देऊ!
रात्रीचे भय आम्हास नसते
रात्रीनंतर पहाट असते
कर्तृत्वाचे दीप लावुनी, प्रकाश आम्ही पेरू!
अक्षरवेली अंगणी लावू
शब्द्फुलांना अंतरी माळू
सृजनाचे हे पंख लेवुनी, स्वर्ग भूवरी आणू!