ऐक हाइकु
लिहीन म्हणते मी
सात हाइकु
रचे हाइकु
सुगरण बायकू
गुणाची काकू
जरी वाटते
अवघड हाइकु
घाबरू नकु
लिहू हाइकु
कवितेच्या अंगणी
आपण टिकू
एवढे करू
लिहिताना हाइकु
सत्यच बकू
हाइकुसाठी
वेळात वेळ काढू
थोडेसे चुकू
प्रयत्न करू
हाइकुत हाइकु
छान हुडकू