In this poem the poetess says, “Terrorists in any field are dangerous. Terrorists create terror.
In this poem poetess says, we should try our best to finish terrorism. We should find out true stars on the earth. Suicide, war on the battlefield is not good for our nations development. So such type of things must be stopped. Corruption in any field must stopped.
अतिरेकी मारू सारे आणू प्रेमवारे
जगाला या दाखवूया भारताचे तारे
आत्मघात असो किंवा असो देशघात
थांबवारे हिंसा आता नको रक्तपात
वंश, लिंग, धर्म, पंथ विसरू जातपात
एकसंध होऊनिया लढू एकजात
अतिरेकी डोक्यावर जिथे तिथे स्वार
लोभ मोह सोडुनिया करू तया गार
चीत त्यांना करावया करू असे वार
ठोश्याला या ठोसा देऊ अस्मितेला धार
अती हाव संपविते प्रेम नीती न्याय
भ्रष्ट सत्ताधाऱ्यांचे हो खेचुयात पाय
प्रकृतीचे करा लाड, संस्कृतीचे दान
हृदयीचे प्रेम जपा, जाळा विकृतीचे रान
शिंगावरी पेला आता देशाचाहा भार
शिंग फुंकायाचा आता करा निर्धार
दुधाचेही ऋण फेडा, झेला शिंगाचेही वार
दृष्टी तीक्ष्ण बनवाहो जशी नभी घार