अनुकूलच हे द्रव्य क्षेत्र नि काळही आम्हास
भूतकाळही अतीव सुंदर दिसतो बिंबात
वर्तमानही जगून सुंदर उजळ भविष्यास
दिगंबरांच्या जैन पथावर फुलवू काव्यात
सान बालके तरुण पिढीला दिशा दाखवून
जिनानुयायांच्या धर्माला नेऊ विश्वात
गृहस्थ जीवन जगता जगता मोक्ष पथिक होत
निर्भय आम्ही ठेवू तेवत प्रेमाची ज्योत
मात्रावृत्त (मात्रा २५)