मम हृदयी तू भगवंता होना आता स्थीर
अंतर्यामी वाहूदे शुद्ध भक्तिचे नीर
क्षीरोदधिच्या स्नानाने धवल होउदे धीर
तूच औषधी आतारे मिटवाया मम पीर
तप करुनी मी ज्ञानार्थी सोडत आहे तीर
झेलायाला उभे इथे कषाय त्यागुन वीर
चरू म्हणूनी मी अर्पे शब्दफुलांची खीर
तीर्थंकर हे नाम तुझे पायाशी तसवीर
हस्त जोडुनी ठेवावी घडीव सुंदर चीर
पंचइंद्रिये आत्म्यासह माझे मूर्त शरीर
तव चरणांच्या स्पर्शाने झाले आज अमीर
हृदयामध्ये झुळझुळतो सौरभ सुमन समीर
मात्रावृत्त((१४+११=२५मात्रा)