अलबत – “of course”


अश्विन मासी पाऊसधारा
भिजवून गेल्या अवघ्या राना
ईशान्य मोसमी परतीचा
पाऊस भाऊ धरतीचा
पाणीच पाणी झरझरते
निर्झरातुनी खळखळते
दुहितेमधुनी झुळझुळते
समुद्र भरती उधाणते
……..दीपावली पावन मंगलमय
गाती  झाडे वेली जय जय
सुखद गारवा सुखावते सय
ओळ दिव्यांची काय सांगते
मोक्षलक्षुमी पूजन करुनी
रत्नत्रय धन जिवा लाभते

नूतन वीर निर्वाण संवत
स्वागतास मी आहे अलबत

, ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.