In this parody poem the message is given that, we must use water carefully.
‘Aaj bhaandane punhaa petali nalavaree'(आज भांडणे पुन्हा पेटली नळावरी) is a parody poem or Vidamban kaavy based on the original song, ‘Aaj chandane unhaat hasale tuzyaamule'(आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे, गीत- शांता शेळके, गायक-सुधीर फडके-आशा भोसले, चित्रपट- कलंकशोभा).
आज भांडणे, पुन्हा पेटली, नळावरी!
राग कुणाचा, इथे निघे बघ, कुणावरी!
लख्ख करोनी, तिने बादली,
शेजारिणिला, साद घातली,
येना लवकर! रांग चालली, नभावरी!
गप्पाटप्पा करताना चुकला,
आधी नंबर, त्याचा आला,
म्हणून मडके, कुणी फोडते, भुईवरी!
कुणी घासते, इथेच हंडा,
तापुन कोणी, करिते दंगा,
भरली घागर, कुणी ओतते, शिरावरी!