आठवण – AATHAVAN


Aathavan means memory. Here poetess tells us about her sweet memory.

तुझी म्हणाया नको वाटले
म्हणून तिजला निळी म्हणाले
निळी जाहल्यावरती तिजला
किती किती तू खुळी म्हणाले
खुळी जाहल्यावरती वेडी
सैरावैरा पळू लागली
आवरता तो नाच तिचा मग
गात्रे माझी थकू लागली
आठवण जरी ती तुझीच होती
कैक आठवणी गाऊ लागल्या
रंगबिरंगी हार बनूनी
गळ्यात माझ्या पडू लागल्या
सुगंध त्यातिल मृदू फुलांचा
प्राशून रमले मी माझ्यातच
गाण्यामधुनी काव्यामधुनी
उतरत गेले मी माझ्यातच
सापडली मज तिथे बावरी
अधरावरती तिच्या बासरी
पाव्यामधल्या सुरात मंजुळ
वाजत होते घुंगुर खळखळ
नाद ऐकता उमलत गेली
हृदयवासरी उमटत गेली
उलटत जाता पाने पाने
सापडली मज प्रीत बावरी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.