आठवते मज ऊन कोवळे
गच्चीमधले झुळझुळणारे
माझी कविता माझे गाणे
नकळत माझ्या खळखळणारे
धडपड तेव्हा केली होती
अक्षर प्रीती पेरायाची
लोटून माती मृदुल त्यावरी
रिमझिम पाणी शिम्पायाची
झाड फुलांचे अता बहरले
सावलीत मी आहे आता
भिजव मला तू चिंब फुलांनी
हलवुन फांद्या येता जाता….
One response to “आठवते मज – AATHAVATE MAJ”
Sunetraji, tumchya kavyatil geyata; shabd tar aahetch. Salam.