आठवतो तो – AATHAVATO TO


In this poem the poetess reminds some of her sweet memories of teen-age days.

खट्याळ अवखळ नेत्रांमधली,
साद घालता गाज कुणाला,
गुलाब हसतो अधरी माझ्या,
आठवतो तो प्रहर मनाला…

डोहामध्ये पाय बुडवुनी,
मी माझ्याशी बोलत असता,
कौतुक भरला तुझा चेहरा,
आठवतो तो प्रहर मनाला…

मौनाची ही अबोल फांदी,
चेहऱ्यावरची हसरी रेषा,
हृदय बांधता तयास झूला,
आठवतो तो प्रहर मनाला…

इंद्रधनूचे पंख लेउनी,
अबलख वारू मम काव्याचे,
उधळित जाता बकुळ फुलांना,
आठवतो तो प्रहर मनाला…

गाभाऱ्यातिल तरू बहरता,
मंदिर उघडी अवघ्या खिडक्या,
फुले चुंबिती निळ्या नभाला,
आठवतो तो प्रहर मनाला…

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.