जीव जाणतो जीवांमध्ये ज्ञान राहते
जीवाहुन या अमुल्य दुसरे काही नसते
कर्म करावे जैसे तैसे फळ मिळते जाणू
आत्म्यातील आनंद लुटाया भय सारे त्यागू
सम्यकदृष्टी जीवांसाठी आत्मधर्म आहे
शरण्य अपुल्या आत्म्याहुन ना कुणी अन्य आहे
अंतर्यामी शुद्धात्म्याला सदैव ठेवावे
अपुल्या वाटेवरून निर्भय होऊन चालावे
आत्मशांतीची खरी संपदा जीवा लाभाया
आत्मभक्तीला जाणुन घ्यावे मुक्ती साधाया