प्रेम करायचे असते बघ आयुष्यावर
ओझे नसते बनायचे बघ आयुष्यावर
आयुष्याचा हिशेब नसतो मांडायचा
आठवणींचा अल्बम असतो जपावयाचा
आयुष्यावर म्हणुन लिहावी सुंदर गाणी
त्यात भेटते आपल्यामधली कुणी दिवाणी
म्हणायचेना अशी दिवाणी असा दिवाणा
प्रेमामध्ये समान सारे नसे बहाणा
नुसते तू तू नुसते मी मी रोग मनाचे
मीपण तूपण पथ्यापुरते जपावयाचे
मीपण बघण्या वेळ जरासा मनास द्यावा
तूपण सुटण्या दृष्टीमध्ये रंग भरावा