ऊठ मुला – OOTH (UTH) MULAA


ऊठ मुला जागा हो सत्वर
तुला जायचे बघ कामावर

विधी आटपुन भल्या पहाटे
प्रसन्न ताजे तुजला वाटे

करून कामे लवकर लवकर
घरास ये तू बनून अवखळ

आनंदाने हसत राहशिल
जीवन जगण्या फ़ुलशिल खुलशिल

आता ना मज कुठली चिंता
आत्म्यामध्ये तू भगवंता


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.