ऊन काहिली थंड कराया पाऊस गाणी झरती
चला जाऊया सैर कराया डोंगर माथ्यावरती
कुदळ फावडे घेऊन हाती हात आमुचे खणती
तण उपटूया खड्डे करूया खांब रोवण्यासाठी
भूमी मापन अचुक करूया घेऊन हाती काठी
घाम गाळूया माती भरुया धावू वाऱ्यापाठी
मडके भरुया सडा शिंपुया जमीन करण्या ओली
लांबी रुंदी उंचीसंगे भरून टाकू खोली
कुंपण गर्द कराया पेरू कवितेमधली बोली
खात शिदोरी चटक मटक मग अंगत पंगत करूया
सूर्यास्ताचे रंग पाहुनी घराकडे परतूया
निद्रा देवी कुशीत घेता पहाट उज्वल बघूया