कधी कधी मी टांगेवाली
कधी कधी अन भांडेवाली
भांडेवाली मी नखर्याची
करे धुलाई हर पात्रांची
कधी डोईवर घेउन हारा
विकते भांडी दारोदारा
सुबक ठेंगणा लठ्ठ सावळा
तेल भराया कान-कावळा
तेलाने जेंव्हा कळकटतो
जोर लावुनी घास घासते
धरुन नळाच्या धारेखाली
स्नान घालते त्यास सकाळी
तयात ओतून गोडेतेला
नीट ठेवते वरी टेबला
बांधुन बुचडा मग केसांचा
फडशा पाडे मी भांड्यांचा
पाट ओळीने मांडुन सुंदर
भांड्यांचे मी रचिते झुंबर