गझलसदृश्य – GAZAL SADRUSHYA


जर्द रवीला जाळ म्हणूया
भडक फुलांची दुशाल म्हणुया

करे प्रदर्शन दानाचे जी
तिजला बोली सवाल म्हणुया

स्वच्छ मनाचे मुलगे जे जे
त्या मुलग्यांना बाल म्हणूया

पक्षपात जो कधी न करतो
त्याला सुंदर काल म्हणूया

कटकट मोडे त्या काष्ठाला
मस्त भिजोनी वाळ म्हणूया

जीव जीवाला जीवच म्हणतो
पुदगलास पण माल म्हणूया

सिंहकटीसम कमर जिची तिज
चाळ घालुनी चाल म्हणूया

मात्रावृत्त – १६ मात्रा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.