In this poem the poetess says, when world was ruled by mad people there were only few wise people. When these wise people became very very wise, mad people get confused. Mad people begin to write poems…and then what happened? shaddap!!!!
जग वेडयांचे होते तेव्हा शहाणे होते थोडे
अति शहाणे झाले सारे वेड्यांना पडले कोडे
जग वेडयांचे छान साजरे फुला-मुलांची गर्दी
फुलाफुलावर फूलपाखरे रंगित त्यांची वर्दी
पंख पसरुनी झाडे उडती हिंदोळेही झुलती
शहाणे छाटुन त्या पंखांना हवेत इमले रचती
दगडविटांचे जंगल माजे पुतळे रोज नवे
करपुन गेली माती काळी रडते हृदयासवे
हात फाटले तरी न विझल्या नयनामधल्या वाती
पिऊन अश्रू रात्र जागते कुरवाळत नाती
रडती जेव्हा झाडे पिवळी पूर उन्हाचा येतो
काठावरती उभे शहाणे वेडा कुणी बुडतो
या वेड्यांना ठोका बेडया खोल खोल बुडवा
दीड शहाणे वदले तेव्हा पेटुन उसळे लाव्हा
घोडयावरती बसले वेडे परजत तलवारी
शब्द फुलांची धारच न्यारी कापी दगडे सारी
दगडांमधुनी झरे उसळले रंगांचे गंधांचे
शहाण्यांना पण कळेल काहो महत्व सृजनाचे