एक म्हणजे फेक नाही एक म्हणजे एकच
दोन म्हणजे कोण नाही दोन म्हणजे दोनच
तीन म्हणजे हीन नाही तीन म्हणजे तीनच
चार म्हणजे ठार नाही चार म्हणजे चारच
पाच म्हणजे काच नाही पाच म्हणजे पाचच
सहा म्हणजे महा नाही सहा म्हणजे सहाच
सात म्हणजे घात नाही सात म्हणजे सातच
आठ म्हणजे गाठ नाही आठ म्हणजे आठच
नऊ म्हणजे मऊ नाही नऊ म्हणजे नऊच
दहा म्हणजे गुहा नाही दहा म्हणजे दहाच
एक आणि एक म्हणजे नाही अकरा बिकरा
चक्रेत मिळवा चक्कर बेरीज दोन चकरा
भलते सलते अर्थ टाळा पुरे झाल्या टकरा
दहामध्ये एक मिळवा होतील मग अकरा
एकासमोर एक लिहा दिसेल मग अकरा