जय रमणी मन हरिणी गुणवर्धन जननी
तव उदरी नव नगरी रत्नत्रय खाणी
तू दुहिता झुळझुळता तेजोमय सदनी
मृदु निश्चय व्यवहारे जाणिशि नय दोन्ही
दल अधरी क्षिर झरुनी फुलते ही सृष्टी
घट गवळण भरभरुनी करते बघ वृष्टी
घन अंबर तन झुंबर सळसळतो अग्नी
मंजुळ रव नीतळ दव जल आरसपानी
शशधर तो अघहर श्री धरितो शक्तीला
सत वचना भाषामय मधुरा भक्तीला
जयमाला वनबाला रचीते सुनेत्रा
ज्ञानाने स्नेहाने भरीते अणू पात्रा