कर्तव्याचे भान असूदे हक्क मागताना
खरेपणाची जाण दिसूदे भाव तोलताना
स्याद्वादाची दृष्टी असूदे अर्थ लावताना
व्यवहारातिल चोखपणाला व्यवहाराने जाणा
व्यवहारातिल निश्चय जपण्या ताठ असावा बाणा
ताठ असावा कणा बुद्धिचा परी नच ताठर रे
ममतेच्या पातीची त्यावर घालू पाखर रे
लेखणीची वा तलवारीची जात इमानी खरी
जीवातिल चैतन्य टिपाया लढते धरेवरी
लढता लढता पडेल अथवा मरेल मानाने
बुडून तारू येता वरती तरेल डौलाने