हृदयामधली परी जादुई नित्य मला सांगते
मला हवे ते घडेल म्हणते मधुर मधुर गाते
माझ्या काव्यामधली शक्ती जगास अवघ्या कळली
म्हणून केवळ पुण्ये माझी ओंजळीत फळली
प्रियजन माझे सदा सर्वदा होतील आनंदी
रक्षाया जीवाला त्यांच्या मीच जादुई कांडी
मैत्री माझी शुद्ध जिवांशी मी उर्जा स्तोत्र
हवे हवे ते मिळवाया मी प्राणवायुचा झोत
गर्वाने ज्या मूढ जिवांना अती अती ग्रासले
त्यांच्यामधल्या गर्वाला मी शब्दांनी ठेचले
वैद्य जादुई रक्षक दाता काव्यच माझे खरे
कथा काव्य अन गझला ललिते सुखात मज बुडवे
अभय लाभले मम परिवारा धनदौलत लाभली
मोक्षार्थी जीवांची यात्रा कंटक विरहित झाली