जेव्हा प्रथम भेटलास तेव्हा – WHEN YOU MET ME FIRST TIME


This poem is written in ‘Mukt-chhanda’ vrutta. Here the poetess describes  first meeting with her beloved person.

जेव्हा प्रथम भेटलास तेव्हा
तूही होतास माझ्यासारखाच
पाहिलंस  एकदाच, आणि…
नजर न मिळवताही
मनात शिरलास आरपार
नकळत छेडल्या तारा आणि-
हृदयातून उमटला एक निशब्द सूर…
अलगद शिरलास आत
अगदी  हृदयाच्या तळात
वर आलास, चिंब चिंब भिजून
टपटपणारे निळे निळे वस्त्र लेऊन
कोठून आणलीस ही निळाई?
म्हणून डोकावले आत,
दिसला एक कोवळा अंकुर
तरंगताना त्या निळ्या तळ्यात
हरखून गेलं मन साद घातली त्यानं
अंकुर आला वरती
लेऊन पोपटी पोपटी पानं
गंधभऱ्या झुळकीनं डोलायला लागला
तनात मनात पसरत गेला
अगदी तुझ्यासारखाच!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.