झाडांसंगे करून मैत्री चला गाउया गाणे
चिमण्यांसाठी स्वच्छ अंगणी भरड पाखडू दाणे
शकुन सांगण्या रोज कावळा उडून येता दारी
न्याहरीस मग देऊ त्याला गरमागरम भाकरी
गच्चीमध्ये रान पारवे नाचत येती जेव्हां
वाढू त्यांना चघळायाला कडधान्याचा मेवा
तहानलेला पक्षि अनामिक बनुन पाहुणा येता
वाडग्यातुनी पाणी देऊ नाश्त्याला पास्ता
सायंकाळी झोपाळ्यावर बसून झोके घेऊ
दिवा लावुनी देवापुढती मस्तक चरणी ठेवू
मात्रावृत्त (८+८+१२=२८ मात्रा)