In this poem the poetess says, ‘Jin-bimb is a symbol of pure soul. Tirthankars have pure soul. No other person is as beautiful as Tirthankar(तीर्थंकर).’
तीर्थंकर बाळासम सुंदर कुणी न तिन्ही जगती
जिनबिंबाचे दर्शन घेण्या अधीर जन सुरपती
रूप मनोहर तीन छत्रयुत आम्रतरूच्या तळी
झळाळणारी सुवर्णकांती पद्मे चरणा तली
चौसठ चवऱ्या निसर्गकन्या भवताली ढाळती
वाणी शीतल जणु सुरभित जल सर्वांगातुन खिरे
पारिजात मंदार मोगरा नभातुनी झरझरे
चरण धुळीवर बकूल पुष्पे झुकून टपटपती
आवडनावड तृष्णा मृगजल विरते शुभ्र जळी
विशुध्द प्रीती सर्व जिवांशी हृदयी बघ फुलली
बाळ गोमटे सर्व जाणते तिन्ही लोक गाती