तुझी प्रिया – TUZEE PRIYAA


नको म्हणू मज बदललीस तू अशीच आहे तुझी प्रिया
नको म्हणू तिज घडवलेस तू अशीच आहे तुझी प्रिया

घडवायाचे कुणी कुणाला जो तो घडतो स्वतः स्वतः
प्रेमाने ती फुलते खुलते अशीच आहे तुझी प्रिया

कुणी कुणाहुन नाही सुंदर कशास तुलना करिशी तू
तुलनेने या कोमेजे ती अशीच आहे तुझी प्रिया

गोड हासते खरे बोलते म्हणुन आवडे सर्वांना
तुझ्याच इतुकी जपते जीवा अशीच आहे तुझी प्रिया

नाव ‘सुनेत्रा’ अर्थपूर्ण हे मला शोभते किती किती
हृदयामध्ये बिंब पाहते अशीच आहे तुझी प्रिया

मात्रावृत्त -( ८+८+८+६=३०मात्रा)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.