This poem is written in ‘Mukt-chhanda. We can describe this type of poem as ‘Lalit-kavya’ also. This is a ‘Fantasy’ type of poetry.
It is a “Guj-goshta” between teen-agers.
अशीच एक सुस्त दुपार…
Electronics ची lab , टेबलासमोर उभी असलेली ती,
आणि… समोर असलेली ती भली मोठी circuit digram,
capacitors, resisters, voltmeter…amiter, I C’s
आणि वायरींचे जंजाळ;
बापरे बाप!
कशी करावीत connections?
शेजारच्याच टेबलासमोर स्कॉलर उभा आहे.
नाकावर घसरलेला चष्मा नीट करीत कसा पटापट reading घेतोय,
“Excuse me!” ती म्हणते,
आणि मग… स्वप्नातुन जागा झाल्यासारखा तो विचारतो,
“काही म्हणालात?”
” connections करायला थोडी मदत कराल? “…ती;
स्कॉलर झटकन पुढे येतो,
टेबलावरच्या circuit वरून एकवार नजर फिरवतो, आणि म्हणतो,
“Oh, it’s so simple!,
परवा हयाच्याच टेस्टमध्ये माझा अर्धा मार्क गेला…
फक्त युनिट लिहिलं नाही म्हणून!
पण…तुम्हाला तर त्यात फुल मार्क्स मिळाले होतेना? ते कसे काय? ”
तशी ती ओशाळते आणि म्हणते,
“टेस्टच एवढं कायहो? फक्त थेअरीच तर लिहायची असते,
एकदा वाचलीकी पक्की डोक्यात बसते.”
मग स्कॉलर पटापट connections करतो आणि म्हणतो,
“हं, घ्या आता readings;
तुम्हा मुलींचं घोडं इथच तर पेंड खातं,
थेअरी तेवढी डोक्यात असते,
practical च्या नावानं बोंब असते!”
तशीच एक सुस्त पण मस्त दुपार…
हातातला जर्नल्सचा गठ्ठा सांभाळत ती lab मधून बाहेर पडते.
दारातच स्कॉलर उभा असतो, हळूच म्हणतो,
“तुमची ती कविता… वाचली बरं मी!”
तिचा गोंधळलेला चेहरा,
मग पुन्हा तोच म्हणतो,
“ती कविताहो, कॉलेजच्या मासिकातली,
तो, ती आणि सुस्त दुपार!”
तशी ती हळूच हसते. मग तोच पुन्हा म्हणतो,
“छान होती हं कविता…”
मग तो खिशातून पेन काढतो,
चॉकलेटी रंगाचं, सोनेरी टोपणाचं!
मग म्हणतो, “हे घ्या पेन, तुमच्यासाठी खास भेट!”
तशी ती खूष होते आणि म्हणते,
“वा! खूपच छान आहे हं पेन!
आता जर्नल्स याच पेनानं लिहीन म्हणते;
पण काळी शाईच आहेना यात?
काळ्या शाईचं अक्षर खूप छान येतं.”
तसा स्कॉलर चिडतो, तार स्वरात म्हणतो,
“अहो जर्नल्स कसली लिहिताय? …
या पेनानं कविता लिहा, छान छान पत्रं लिहा…”
स्कॉलरचा तार स्वर एकदम खर्जात जातो.
मग ती गोंधळून म्हणते,
“आता पत्रं कोणाला लिहू?
आमची सगळी नातेवाईक मंडळी जवळच तर राहतात.”
मग मात्र स्कॉलर चिडतो, म्हणतो,
“द्या ते पेन इकडे!
तुम्हा मुलींचं घोडं इथच तर पेंड खातं,
थेअरी तेवढी डोक्यात असते…
practical च्या नावानं बोंब असते.”
तो ताडताड पावले टाकत निघून जातो.
ती तशीच रूमवर येते,
जर्नल्सचा गठ्ठा टेबलावर आदळते;
रेडीओचं बटन ऑन करते,
खुर्चीत बसल्या बसल्या झुलायला लागते…
गाण्याचे बेधुंद सूर…हळूहळू तिची टयूब पेटायला लागते,
आणि मग एकदम ..लख्खदिशी पेटते.
मग ती स्वत:शीच हसते आणि म्हणते,
“स्कॉलरसाहेबांची विकेट उडालेली दिसते!”