दिसू लागला स्वच्छ किनारा ध्वज फडफडणारा
दिसू लागला शांत किनारा बेटावर किल्ला
दिसू लागला बुरूज दगडी माडांची वाडी
दिसू लागल्या काजू बागा करवंदी मेवा
पाण्यावरचा तरंग इथल्या गात पुढे जावा
हरेक अधरांवरती वाजो हृदयातिल पावा
जीव येथल्या मातीमधला मोक्षाला जावा
प्रेमामध्ये सौख्यामध्ये चिंब चिंब न्हावा