काळ्या मातीमधली धवला नाजुक साजुक कपास आणू
साध्या यंत्रावरती हलके कोमल कणखर दोरा बनवू
वळून दोरे हातावरती अखंड मजबुत धागा घडवू
मृद्गंधासम बकुळ फुलांच्या अर्कामध्ये त्याला बुडवू
जास्वंदीच्या चुरुन पाकळ्या कुंकुमवर्णी रंगी भिजवू
सुकवुन धागा पीत सुवासिक शेवंतीची फांती गुंफू
सुई कशाला फुले गुंफण्या कुशल अंगुली आपण वळवू
One response to “धागा – DHAAGAA”
apratim kavita.