कैकवेळा नाव लिहिले खोडलेही कैकदा
पण पहाटे साद घाली ध्रुव तारा हासरा
मी कधी होते तुझी अन मी कधी माझीचरे
गुंतले नावात होते मी तशी साधीचरे
नाव असुदे गाव असुदे गुंतलेली वासना
आत्मियाशी फक्त जोडे शुद्ध सुंदर भावना
मुग्धता प्रेमातली वा धुंद लाटा सागरी
स्वर्ग मी हिंडून येते घेत त्या अंगावरी
आज मी आहे इथे पण मी उद्या असणारका
प्रश्न हा मज ना छळे रे जाणते मी उत्तरा
उत्तरे ना शोधते मी उत्तरांना कांडते
गुंफुनी काव्यात माझ्या मी तयांना सोडते