In this ghazal poetess says that she wants freedom. She doesn’t want gold ornaments, big palace or expensive costumes. She just wants to breathe freely. This Ghazal is written in matravrutta. This ghazal is written in 24 matras.
मला परीचे,धवल फुलाचे, पंख हवेरे
धुक्यात विरण्या, मज स्वप्नाचे, पंख हवेरे
हवी कशाला, सुवर्णमाला, बंध रेशमी
नको गुलामी, मला पिसाचे, पंख हवेरे
नको भरजरी जडाव शालू, मुकुट फुलांचे
मखर उधळण्या, मला शराचे, पंख हवेरे
ढगास चुंबी, महाल दगडी, श्वास गुदमरे
नभात उडण्या, मला खगाचे, पंख हवेरे
कशास कुंपण बाभुळ वदली, बोर गरजली
तनास काटे, मला शिवाचे, पंख हवेरे