तांब्यावर पानांची महिरप
हळदीकुंकू टिकल्या मळवट
प्याल्यामध्ये लिंबू सरबत
चाले लगबग कसले खलबत
पायापाशी जळी मृदुल कण
आतिथ्याने नटले क्षणक्षण
ओटीमधला नारळ नटखट
जयात लपले कोडे अनवट
जांभुळवर्णी वसन गडद खण
त्यात बांधुनी दिले सजल घन
तांब्यावर पानांची महिरप
हळदीकुंकू टिकल्या मळवट
प्याल्यामध्ये लिंबू सरबत
चाले लगबग कसले खलबत
पायापाशी जळी मृदुल कण
आतिथ्याने नटले क्षणक्षण
ओटीमधला नारळ नटखट
जयात लपले कोडे अनवट
जांभुळवर्णी वसन गडद खण
त्यात बांधुनी दिले सजल घन