पंचप्राण मम जाहले,
पंचभुतांवर स्वार।
जिनवाणीला प्राशुनी,
करेन हा भवपार।
विषय वासना भावना,
छळोन मजला फार।
धरेन भगवन मस्तकी,
शुद्ध भक्तिची धार।
खरेपणाचे शस्त्र हे,
परजिन त्याची धार।
मिथ्यात्वावर घातकी,
चालवेन तलवार।
हृदय मंदिरी मूर्त ही,
गळ्यात मौक्तिक हार।
स्वागत करण्या प्रीतिचे,
सदैव उघडे दार।
मात्रावृत्त (१३+११= २४ मात्रा)